Maharashtra Police Bharti 2022 | New Update Police Bharti

 


Maharashtra Police Bharti 2022 | New Update


Maharashtra Police bharti update 2022 – 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शुक्रवारी अहमदगनर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या  कामाचा आढावा घेतला आणि यानंतर गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. 

त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची काही माहिती दिली. राज्यात लवकरच 7 हजार 200 पदा साठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ही भरती पूर्ण झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.



दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री) काय म्हणाले बघा - 

5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्ण होत आले आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली आहे, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता व त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.





Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad