महाज्योती मार्फत मोफत टॅब | Mahajyoti Free Tab Yojana 2023


 मित्रानो,

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET / JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.


अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.

3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी

4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी. 

5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.


ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1. 9 वी ची गुणपत्रिका

2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र

3. आधार कार्ड

4. रहिवासी दाखला

5. जातीचे प्रमाणपत्र

6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र


ऑनलाईन पध्दतीने - अर्ज करा





1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील " Application for  MHT- CET / JEE / NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad